ताज्या घडामोडी

ॲड. परांजपे विद्यालयात कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळा

तळेगाव : येथील ॲड. पु.वा. परांजपे विद्यालयात कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सोपान, मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान केली होती. त्याचबरोबर शिक्षक देखील वारकरी वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते.

दिंडी सोहळ्याची सुरुवात परांजपे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली दाभाडे, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून करण्यात आले.प्रवचनकार ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे यांनी प्रवचनरुपी सेवेतून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे असा उपदेश केला. विद्यार्थी शिक्षक यांनी सादर केलेली विविध भजने, गवळणी, अभंग यामुळे शाळा परिसराचे वातावरण न्हाऊन निघाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!