ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पुरस्कार

पुणे  : पुणे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या  वतीने देण्यात येणारा आदर्श अंगणवाडी सेविका,मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार समारंभ जिल्हा परिषद पुणे येथे  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मावळ तालुक्यातील खंडोबा मंदिर अंगणवाडी,वडगाव मावळ येथील अंगणवाडी सेविका अर्चना ढोरे यांना हा पुरस्कार अजितदादा पवार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व कृषी सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या उपस्थिती मध्ये देण्यात आला.

मला हा पुरस्कार सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माझी अंगणवाडी स्मार्ट अंगणवाडी म्हणून ओळखली जाऊ लागली तसेच माझ्या अंगणवाडी साठी भरीव निधी अप्पांनी त्यांच्या फंडातून उपलब्ध करून दिल्यामुळेच ह्या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मला मान मिळाला अश्या शब्दात अर्चना ढोरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे,महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे,
मा.अध्यक्ष विश्वास नाना देवकाते,सदस्य वीरधवल जगदाळे,अर्चना कामठे,भरत नाना खैरे,अति मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे इत्यादी पदाधिकारी मान्यवर तसेच पुरस्कर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!