ताज्या घडामोडी

तळेगाव चाकण महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी ; मध्यरात्रीपासून वाहतूक ठप्प

तळेगाव : येथील तळेगाव – चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास सुरू झालेल्या वाहतूक कोंडीत सकाळपर्यंत भर पडली. त्यामुळे तळेगाव ते चाकण संपूर्ण मार्ग वाहनांनी जाम झाला होता.

वाहतूक कोंडीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र संततधार पावसामुळे संथ गतीने चालणारी वाहतूक तसेच या मार्गावर असलेले खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे वाहतूक कोंडी झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच एकाच जागी उभी राहिलेली बंद पडलेली अवजड वाहने पुढे जाण्याच्या प्रयत्नात त्यांनी केलेल्या दोन ते तीन रांगा यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली.

सकाळी सात ते आठच्या दरम्यान तळेगाव दाभाडे शहरातील मराठा क्रांती चौकात तसेच स्टेशन चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. असे असतानाही एकही वाहतूक पोलिस या ठिकाणी उपस्थित नव्हते. रात्रीपासून झालेल्या वाहतूक कोंडीने चाकण एमआयडीसीत जाणारे चाकरमानी तासनतास वाहतूक कोंडीत अडकलेल्या त्रस्त झाले होते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात हाल झाले.

कालपासून सुरू असलेला पाऊस त्यामुळे मार्गालगत झालेला चिखल आणि वाहतूक कोंडी यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यावेळी वाहतूक पोलिसांची कमतरता जाणवत असल्याने रात्रीपासून वाहतूक कोंडी झालेली असतानाही वाहतूक पोलिस यंत्रणा सकाळी आठ वाजले तरी सजग का नव्हती ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!