ताज्या घडामोडी

1 डिसेंबरपासून ‘या’ वस्तू झाल्या महाग

तळेगाव : मागील दोन वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर पुन्हा महागाईची कुऱ्हाड कोसळली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस टीव्ही पाहणे, व्यावसायिक वापराचा सिलेंडर, मोबाईल रिचार्ज, क्रेडिट कार्ड व्यवहार यांच्यासह काडेपेटी महागली आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोना संकट त्यानंतर चक्रीवादळ व आता अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांना हैराण केले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

चारच दिवसांपूर्वी एफएमसीजी कंपन्यांनी त्यांच्या साबण व डिर्टजंटच्या दरात मोठी वाढ केली. पेट्रोल व डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच एक डिसेंबरपासून काडेपेटीसह, क्रेडिट कार्ड व्यवहार, व्यावसायिक सिलेंडर व डीटीएच रिचार्ज महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!