ताज्या घडामोडी
तळेगावात 8 डिसेंबर रोजी कै. धनाजी बापूराव जाधव सभागृहाचा उद्घाटन सोहळा
तळेगाव : येथील राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ/ हिंदू-मुस्लीम ट्रस्ट यांच्या द्वारे आयोजित कै. धनाजी बापूराव जाधव सभागृहाचा उद्घाटन सोहळा बुधवार( दि.8 डिसेंबर) रोजी सायंकाळी 5:30 वाजता राजेंद्र चौक, डाळ आळी बाजारपेठ येथे हभप चंद्रकांत महाराज वांजळे व हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते होणार आहे.
तळेगावातील वारकरी सांप्रदयासाठी कै. धनाजी बापूराव जाधव सभागृहाचे निर्माण करण्यात आले आहे. या सभागृहाचा लोकार्पण सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.