राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वक्तृत्व / भाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन
नायगाव : देशाचे लोकनेते मा. कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व सं,तु,स,सा,का, उपाध्यक्ष बापुआण्णा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव येथील लक्ष्मीमंगल कार्यालयात जनसेवक पै देवाभाऊ गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वक्तृत्व / भाषण कौशल्य मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शुक्रवार दि.17 डिसेंबर ते रविवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही तीनदिवसीय मोफत कार्यशाळा पार पडेल.पुरुष व महिला या दोन्ही वर्गासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. वकृत्व व भाषण कौशल्य वाढावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मावळ तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, कला, क्रिडा, व्यापार, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.