ताज्या घडामोडी

शिलाबाई लक्ष्मण मांडेकर यांचे निधन

लोणावळा :  औंढोलीतील जेष्ठ महिला श्रीमती शिलाबाई लक्ष्मण मांडेकर (वय-९० ) यांचे अकस्मिकपणे शनिवारी ता.११ डिसेंबर २०२१ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात दोन विवाहित मुलगे ,तीन विवाहित मुली , सुना , जावई , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.

रेल्वेचे कामगार हरिश्चंद्र लक्ष्मण मांडेकर आणि माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण लक्ष्मण मांडेकर हे त्यांचे सुपुञ होत. युवक कार्यकर्ते चंद्रकांत हरिश्चंद्र मांडेकर आणि भजनगायक अक्षय नारायण मांडेकर हे त्यांचे नातू होत.

कै.शिलाबाई मांडेकर यांनी अतिशय गरीबीतून कष्टाने संसारात मुला , मुलींना लहानाचे मोठे केले. त्यांचेवर सुसंस्कार घडवून त्यांना मोठे केले. औंढोलीत शोकाकूल वातावरणात कै.मांडेकर यांचे पार्थिवावर राञी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!