ताज्या घडामोडी

लोणावळ्यात छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास भव्य रंगमंचावर ता.१५ रोजी होणार

लोणावळा :  शिवदुर्ग मिञ प्रस्तुत व प्रविण नंदकुमार देशमुख लिखित , दिग्ग्दर्शित मराठ्यांची गौरवगाथा हा भव्य नाट्यप्रयोग कोरोनाच्या नंतर होत आहे. लोणावळ्यात छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या , पराक्रमाचा धगधगता इतिहास भव्य रंगमंचावर ता.१५ रोजी लोणावळा नगरपरिषद आणि मावळवार्ता फौडेशन यांचेवतीने आयोजित करण्यात आला असून नाट्यप्रयोग सर्वांसाठी फ्री असल्याचे संयोजक व नगरपरिषदेच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.

२५० कलाकार , १०० फूट लांब दोन मजली रंगमंचावर हा प्रयोग घोडे ,उंट,तसेच बैलगाडी आणि जिवंत तोफा असे यात पहायला मिळणार आहे. आक्रमक शौर्य लढाया , गणेश वंदना , गोंधळ , पोवाडे , लावणी , कव्वाली व मैदानी खेळ प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

लोणावळा येथील डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे प्रांगणात हा प्रयोग होणार आहे. मावळवार्ता फौडेशनचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज , सचिन पारख, नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आणि शिवदुर्ग मिञचे सचिव सुनिल गायकवाड यांचेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!