ताज्या घडामोडी

आरटीओ कार्यालयाकडून खराडी येथे मीटर टेस्टिंग ट्रॅक सुरु

रिक्षा पंचायतीचे कार्यकर्ते करतायेत विनामोबदला सहकर्य

 

खराडी :  रिक्षासाठी  नवीन भाडे दरवाढ लागू झाली आहे. त्यासाठी  रिक्षाच मीटर कॅलिब्रेशन करणे गरजेचे आहे. हे काम लवकरात लवकर  होण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून खालील ठिकाणी मीटर टेस्टिंग ट्रॅक पठाण शहा दर्गा, खराडी रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट इगलबर्ग कंपनी, लेन नंबर ३ फुले नगर आर.टी.ओ येथे सुरु करण्यात आले आहेत.

या ठिकाणी  26 नोव्हेंबर पासून  मीटर टेस्टिंग ट्रॅकचे सर्वेक्षण करण्यात येईल.  मीटर पासिंग संदर्भात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी परिवहन अधिकारी व रिक्षाचालक यामधील दुवा साधण्याचं काम तसेच मीटर टेस्टिंग ट्रॅक बनविण्याच काम कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता रिक्षा पंचायतीचे कार्यकर्ते करत आहेत.

यात रामटेकडी रिक्षा मिटर पांसिग ट्रॅक येथे आनंद बेलमकर, सोपान घोगरे, किसन जगताप, योगेश सुपेकर, सुनिल भाडळे तर खराडी येथे मुस्तफा सय्यद आणि फुले नगर आर.टी.ओ येथे सिद्धार्थ चव्हाण सहकार्य करत आहेत.या सर्व ठिकाणी आत्तापर्यंत 12 हजार पेक्षा जास्त रिक्षांचे पासिंग करण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!