ताज्या घडामोडी

छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास पहाण्यासाठी हजारोंची लोणावळ्यात गर्दी

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना मानपञ

लोणावळा : छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास पहाण्यासाठी हजारो लोणावळेकरांची तसेच मावळाच्या ग्रामिण भागातून लोकांची ‘ गर्दी झाली होती.महानाट्य पहाण्यासाठी डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मागे पटांगण फुल्लहाऊस झाले होते. जेष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यावेळी महानाट्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते.

शिवछञपतींचे पुतळ्यास पुष्पहार घालून नारळ फोडून नाट्यप्रयोग सुरू झाला. यावेळी मावळ वार्ता फौडेशन चे अध्यक्ष सचिन पारख, नवनिर्वाचित अध्यक्ष बाबुजी तथा नंदकुमार वाळंज , लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे , तसेच जेष्ट नगरसेवक श्रीधर पुजारी , लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम दुबल , लोणावळा शहरचे माजी पोलिस निरिक्षक विष्णू पवार , माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड ,नगरसेवक देविदास कडू, निखिल कविश्वर , ललीत सिसोदिया , मावळवार्ता फौडेशनचे पदाधिकारी संजय आडसुळे, जितेंद्र बोञे, विनय विद्वांस ,,नवीन भुरट, संदिप वर्तक, बापूलाल तारे, गिरीश पारख, बाबासाब शेख, उद्योजक अमोल ओंबळे, आशिश बुटाला ,नगरसेविका पूजा गायकवाड , बिंद्रा गणाञा , रचना सिनकर , माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , सभापती मंदा सोनवणे , भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , ,यावेळी उपस्थित होते.

या महानाट्याचे लेखक , दिग्दर्शक प्रविण देशमुख, महानाट्याचे प्रस्तुतकर्ता शिवदुर्ग मिञचे सर्व पदाधिकारी , सुनिल गायकवाड , आनंद गावडे आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवछञपतींची प्रतिमा देवून पुष्पहार घालून लेखक व दिग्दर्शक प्रविण देशमुख यांचा कलादिग्दर्शक श्री.नितीन देसाई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव व मावळवार्ता फौडेशन चे अध्यक्ष सचिन पारख यांचे हस्ते मानपञ देवून प्रसिध्द कलादिग्दर्शक श्री.देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा श्रीमती जाधव म्हणाल्या , लोणावळेकर सर्व पाठीशी राहिले व त्यांनी सहकार्य केल्याने सलग चवथ्या वर्षी देशात स्वच्छ सर्वेक्षण मधे नगरपरिषदेचा दुसरा क्रमांक आला. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या स्पर्धेत आपण भाग घेतला असून मला नगरपरिषदेला पहिला क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांनी यापुढेही सहकार्य करावे. बाप्पूसाहेब तारे यांनी सूञसंचालन केले.

यावेळी मावळ वार्ता फौडेशन चे अध्यक्ष सचिन पारख यांनी भाषणातून सांगितले , कोरोनाच्या भीतीने व कडक निर्बंध लादल्याने दोन वर्षे प्रयोग होऊ शकला नाही. यावर्षी कोरोना कमी झाल्यनंतर हा नाट्यप्रयोग होत आहे. माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांचेही भाषण झाले. यावेळी कलादिग्दर्शक श्री.देसाई म्हणाले , शिवछञपती व धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांना कळावा. त्यांचे प्रेरणादायी इतिहासाची नव्याने ओळख व्हावी ,यासाठी हा चांगला प्रयोग या माध्यमातून होत आहे.एक हरहुन्नरी कलाकार या महानाट्याचे रंगमंचावर येण्यासाठी प्रयत्न आहे.

सत्काराला उत्तर देताना लेखक व दिग्दर्शक श्री प्रविण नंदकुमार देशमुख म्हणाले , दोन वर्षापूर्वी आपण या छञपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचे जीवनातील प्रसंगास महानाट्याचे रूपांतर केल्यामुळै नाट्यप्रयोग होत आहे. ता.२२ आॕक्टोबर रोजी राज्यसरकारने नाट्यप्रयोग सुरू करण्यास परवानगी दिल्याने आणि आपल्यासारखे मायबाप रसिक प्रेक्षक यांची साथ लाभल्याने हा प्रयोग होत आहे. मराठ्यांची गौरवगाथा या प्रयोगासाठी आपण भरभरून दाद दिल्याबद्दल मी सर्वाना धन्यवाद देतो

.यावेळी स्वराज्याची शपथ घेतानाचा प्रसंग , रांझाच्या पाटलाला चौरंगा करण्याची शिक्षा फर्मावतानाचा प्रसंग, प्रतापगडची लढाई व आफजलखानाचा वध करतानाचा प्रसंग , जंजिरा सर करताना पाण्यात सेतूबांधणारे धर्मवीर शंभूराजे , आग्रा येथून नजरकैदेतून छञपती शिवराय , शंभूराजेंना घेवून पेटा-यातून निसटले , तो प्रसंग! , तसेच पन्हाळगडची लढाई येथे शिवाजी काशीद चे स्वराज्याच्या करीता बलीदान बाजीप्रभु देशपांडे यांचे स्वराज्याच्या साठी प्राणांत श्वास आसेपर्यत पराक्रम , शिवराज्यभिषेकदिन तसेच शंभूराजेंना पकडतात व हालहाल करतानाचा प्रसंग तसेच प्रारंभी रामदेवराय यांचे पराभवानंतर हिंदुस्थानातील झालेले अत्याचार ! तसेच येथील जनतेला वाली मिळावा म्हणून राजमाता जिजाऊ आई जगदंबेला साकडे घालतात ,असे अनेक प्रसंग यात आहेत.

घोडे ,उंट,बैलगाडी आदी सह मावळे पताका उंच ठेवत हा नाट्यप्रयोग अत्यंत वेगवान घडामोडीमुळे रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला.अखेर शंभूराजे यांचे बलिदान व्यर्थ न जाता सह्याद्रीच्या कड्याकपारी त्यांचे पोवाडे गायले जावून अजरामर राहतील , असे सुंदर गीत , महिलांनी गायलेल्या ओव्या ,फुगड्या , तसेच पंढरीची वारी , तमाशातील लावणी ,कव्वाली , असे भरगच्च प्रसंग यामधे सादर करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!