ताज्या घडामोडी
‘या’ तारखेला होणार दहावी व बारावीच्या परीक्षा
मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल रोजी होणार असून दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल रोजी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली.
याबाबत माहिती देताना शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या, ओमायक्रोन बाबत मॉनिटरिंग करत आहोत. परंतु विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून तर दहावीची परीक्षा 15 मार्च पासून सुरु होणार आहे.