ताज्या घडामोडी

देहूरोड, पुनावळे, ताथवडे व वाकड येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सुधारीत डीपीआर करा – खासदार बारणे

पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारित डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली.

खासदार बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी बोलताना देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची व रुंदी कमी आहे. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याचा सुधारित डीपीआर बनविण्यात यावा. नवीन डीपीआर बनवल्यास वाहतूक कोंडीची समस्या संपेल असा विश्वास व्यक्त केला.

त्यावर गडकरी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रस्त्याचे काम वेगात करावे व सुधारित डीपी तयार कराव्यात अशा सूचना दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!