ताज्या घडामोडी

भाजे येथील संपर्क संस्थेत क्रीडा सप्ताह साजरा

मळवली : संपर्क सस्थेच्या लिली इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज भाजे – मळवली या शाळेत स्पोर्टस सप्ताह 2021-022 उत्साहात साजरा करण्यात आला. दि.13 ते  18 डिसेंबर पर्यंत लिली स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये स्पोर्टस सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.

यामध्ये खो-खो, कब्बडी,लंगडी,बॅटमिंटन, संगीत खुर्ची,अडथळ्यांची शर्यत, कॅरम बुद्धीबळ , लांब उडी,उंच उडी , रस्सी खेच अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या कोविड मूळे शाळा दीड वर्ष बंद होत्या त्यानंतर हा स्पोर्ट्स सप्ताह घेण्यात आला त्यामुळे मुलांनी देखील या स्पर्धेचा खूपच आनंद घेतला.

स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!