साते गावामध्ये 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा उदघाटन व लोकार्पण सोहळा
साते : सभापती कृषी व पशुसंवर्धन मा.बाबुराव आप्पा वायकर यांच्या फंडातून साते ग्रामपंचायत अंतर्गत,साते गावामध्ये 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा उदघाटन लोकार्पण सोहळा सभापती बाबुराव आप्पा वायकर यांचे हस्ते संपन्न झालाााा
यावेळी ग्रामस्थांनी वायकर यांची ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढली.साते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद फंडातून सुमारे 1 कोटी 20 लक्ष रुपयांची विकासकामे करण्यात आली. यामध्ये,रस्ते,व्यायामशाळा साहित्य,बंदिस्त गटार,हायमास्ट दिवे,सभामंडप, अंगणवाडी इमारत,यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून कामेही पूर्णत्वास गेलेली आहे अशी माहिती सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी ग्रामस्थांना दिली.
यावेळी सरपंच संतोष शिंदे,एकनाथ येवले,प्रकाश अगळमे,मा.सरपंच विठ्ठल मोहिते,जांभूळ सरपंच नागेश ओव्हाळ,मा.उपसरपंच अनिल मोहिते,मारुती अगळमे,रामभाऊ शिंदे,सुरेश(मामु)अगळमे,अर्जुन अगळमे,सुदाम अगळमे,पोपट शिंदे,ग्राम.पं.सदस्य ऋषीनाथ अगळमे,गणेश बोऱ्हाडे,संदीप शिंदे,श्रुती मोहिते,वर्षा नवघणे,आरती अगळमे, मिनाक्षी अगळमे,आम्रपाली मोरे,सुनील दंडेल,सुहास वायकर,adv अक्षय रौन्धल, सोनू पिंजन,निखिल येवले,आशिष शिंदे,मुकुंद अगळमे, उमेश गावडे,रुपेश खाणेकर,संतोष अगळमे,राजू अगळमे,मंगेश शिंदे,जगन्नाथ शिंदे,इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.