आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व
नऊ विद्यार्थ्यांची आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आयोजित केलेल्या विद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाने भरघोस कामगिरी करत वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आह विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांची अंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नम्रता कुंभार (45 किलो द्वितीय क्रमांक), चेतना घोजगे (49 किलो प्रथम क्रमांक), प्रतिक्षा कडू ( 71 किलो प्रथम क्रमांक), प्रणोती नांबरे (71 किलो द्वितीय क्रमांक ),रुचिका ढोरे (81 किलो प्रथम क्रमांक), ऋषिकेश चव्हाण (67 किलो प्रथम क्रमांक), अक्षय म्हाळसकर ( 71 किलो तृतीय क्रमांक), चिराग वाघवले (102 किलो प्रथम क्रमांक) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे इंद्रायणी विद्यामदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी अभिनंदन करून सत्कार केला. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.