ताज्या घडामोडी

देहू नगरपंचायतीसाठी सायंकाळी साडेपाच पर्यंत 74. 97 टक्के मतदान

13 प्रभागातील 48 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

देहू : देहू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 74.97 टक्के मतदान झाले.यामध्ये 5 हजार 649 पुरुष तर 5 हजार 168 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

देहू नगरपंचायतीच्या तेरा प्रभागासाठी 26 मतदान केंद्रावर मतदान पार पडले. 13 प्रभागातील 48 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.

यावेळी निवडणूक रिंगणात राष्ट्रवादीचे 13, भाजप 13, शिवसेना 8, तर कॉंग्रेसचे 5 उमेदवार असून नऊ अपक्ष उमेदवार आहेत. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत आहे. 13 प्रभागातून 48 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर 5 असे 130 कर्मचारी व प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 3   पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 73 पोलीस कर्मचार्‍याचा मोठा बंदोबस्त होता.

नगरपंचायतीच्या 17 प्रभागासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक 11 ,12 ,14 आणि 15 या चार प्रभागांमधील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान झाले. उर्वरित चार प्रभागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. तर 19 जानेवारी रोजी सर्व निकाल जाहीर होणार आहेत.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!