ताज्या घडामोडी

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७ दिवस ध्यान- योगसाधना विषयावर मार्गदर्शन

इंदुरी : चैतन्य इंटरनॅशनल स्कूल(CBSE), इंदुरी मध्ये  सात दिवसाचा अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन
चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये  ज्ञानाला अध्यात्मिका ची सांगड  घालीत सोमवार दिनांक    १३/१२/ २०२१ते  १८/१२/२१ सात दिवसांचा अध्यात्मिक कोर्स,  ओम शांती संस्थेच्या वतीने ध्यान- योगसाधना या विषयावर मार्गदर्शन केले.  सुसंस्कृत व आदर्श पिढी   घडवणे,  ह्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 


कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ब्रह्मकुमारी  भावना दीदी व माताजी संगीता अभंग उपस्थित होते.  या कार्यक्रमांमध्ये ब्रह्मकुमारी भावना दीदी यांनी विद्यार्थ्यांना विद्यालयांमध्ये ज्ञान ग्रहण करीत असताना भारतीय संस्कृती मधील प्रेम, आदर ,सन्मान ,सत्यता, पवित्रता या मानवी मूल्यांची जोपासना कशी करावी ? तसेच ईश्वरीय गूण कोणते, महत्त्व   व कसे आत्मसात करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर सत्संगती चे महत्व , पौष्टिक आहार, व्यक्तिमत्व विकास , मन एकाग्र करण्यासाठी ध्यान साधना   , सकारात्मक विचार  , वेळेचे महत्त्व जाणणे.इत्यादी विषय त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिली.

विद्यार्थ्यांकडून ध्यान साधना व योगाभ्यास करून घेतला. ध्यान योगा अभ्यास व भारतीय संस्कृती या विषयावर चलचित्र विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला सकारात्मक आणि उस्फुर्त प्रतिसाद दिला.  कार्यक्रम शाळेमध्ये व्हावेत अशा भावना विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व्यक्त केल्या व व्यवस्थापनाकडे आभार व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!