ताज्या घडामोडी

शिवनेरीवर शंभर फुटी भगवा ध्वज लावण्यास परवानगी द्या – डॉ. अमोल कोल्हे 

पुणे : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर शंभर फुटी भगवा ध्वज लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. याला रेड्डी यांच्याकडून  सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परंतु परवानगी देण्याबाबत पुरातत्व विभाग दिरंगाई करत असल्याने रेड्डी यांची पुन्हा एकदा भेट करत डॉक्टर कोल्हे यांनी वरील मागणी केली.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!