ताज्या घडामोडी
ओमायक्राॅनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र
दिल्ली : देशात नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात याचा सामना करण्यासाठी वॉर रुम सज्ज करा व गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 213 इतकी आहे. हा व्हेरीयंट तिप्पट वेगाने पसरतो. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून स्थानिक आणि जिल्हा स्तरावर प्रसार रोखावा यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास पत्राद्वारे केंद्राने राज्यांना सांगितले आहे.