ताज्या घडामोडी

कविभुषण विठ्ठल  दळवी यांना कोथुर्णे भुषण गौरव पुरस्कार २०२१ प्रदान

कोथुर्णे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघाचा कवीभुषण पुरस्कार विजेते कोथुर्णे गावचे सुपुत्र दारुंब्रे शाळेतील श्री विठ्ठल रामु दळवी यांना प्राप्त झाला आहे. थोर संतांच्या विचारांचा वसा व वारसा जपत महाराष्ट्राची अस्मिता राखत सतराव्या शतकातील शिवराज्य व प्रभू रामचंद्रांचे रामराज्याची आठवण करून देत रात्रंदिवस आपल्या सुंदर लेखणीतून 1000 काव्य करत कविसंमेलने विद्यार्थ्यांपुढे सादर करत महाराष्ट्रभर हिंडत कवीभुषण, साहित्यरत्न जीवन गौरव असे 19 पुरस्कार घेत मावळ चे नाव उंचावले असुन हिंदू धर्माचे पताका खांद्यावर घेऊन परकीय संस्कृतीच्या आहारी गेलेला मानव मराठी भाषेची संस्कृतीची झालेले हेळसांड पर्यावरण रुपी झालेला ऱ्हास वन्यजीवांना न मिळणारी जागा वाढलेली सिमेंटची जंगले यातच अदृश्य कोरोणाचा शिरकाव मानवाची झालेली वाताहत पाहता ढासळलेली समाज व्यवस्था पाहून जणू देशाचा आर्थिक कणाच मोडल्याचे दिसून येत आहे यातून मानवाचे जीवन सावरणेच कठीण झाले आहे.

सारं काही पाहता मानवाने पृथ्वीवर विचार करणेच सोडून दिले आहे यातूनच संतांचे विचार मात्र खरे होताना दिसत आहे पर्यावरणातून देशसेवा घडावी वड पिंपळ चिंच यांसारख्या अक्सिजन पूरक वनस्पतींची पुन्हा लागवड करून वन्यजीवांना जंगलात जागा मिळावी जगात महान असणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र गोमातेची सेवा करून गोमातेच्या गोमूत्रापासून औषध निर्मिती व मलमुत्रा पासून सुंदर सेंद्रिय शेती करावी आरोग्यातुन देशसेवा व्हावी याच साठी समाजामध्ये विचारांची बीजे रुजवावी वाचनसंस्कृती वाढावी प्रत्येकानं मराठी भाषेची उरी कास धरून संत विचारातून पर्यावरणातून प्राचीन संस्कृतीतून पुन्हा क्रांती व्हावी यातूनच देशातील आरोग्याची घडी बसावी प्रामुख्याने मराठी भाषा ही जगण्याची भाषा आहे हे समजून घेऊन याच मराठी राजभाषेस अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रार्थना करूया पवित्र ग्रंथांचे व नैसर्गिक साधन संपत्तीचे पुन्हा जतन करूया जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या हिंदू धर्माचा मार्ग धरूया सतराव्या शतकातील छत्रपती शिवरायांच्या साहसी कार्याचा पवित्र शिवचरित्राचा पुन्हा जागर करूया प्रेरणादायी पवित्र शिवचरित्र शालेय अभ्यासक्रमात येण्यासाठी एक मुखाने शासनाकडे मागणी करुया, प्रभू रामचंद्रांचे रामराज्य यावे शिवरायांचे शिवराज्य यावे यासाठी प्रत्येकाने प्रार्थना करूया, वन्यजीवांना जंगलात जागा देऊन पर्यावरण रुपी ऱ्हास थांबवून एका विचारांन सृष्टी वाचवूया,

संपूर्ण जगात महान असणाऱ्या या सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म संस्कृती चा व नैसर्गिक साधन संपत्तीचा पुन्हा जागर करून गोमातेचे संगोपन करून ऑक्सीजन पूरक वृक्षांची लागवड करून संत साहित्यातून पवित्र प्राचीन संस्कृतीतून देशाभिमान जागृत करून प्रभू रामचंद्रांनी रामराज्याचा धर्माचा व सत्याचा आधार घेऊन शिवरायांच्या शिवचरित्राचा व पवित्र संविधानाचा मान ठेवून याच मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन पर्यावरणातील ऱ्हास थांबून देशाचे ढासळलेली समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था पर्यावरणातून व आरोग्य तुन देश सावरण्याची नितांत गरज वाटत आहे यासाठी मानवजातीला उभारी देऊन प्रत्येकाने या सेवाभावी कार्यास हातभार लावून देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याची व हिंदू धर्म संस्कृती जपण्याची मी कळकळीची विनंती करीत आहे याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिन गोड व्हावा.

प्रत्येकानं संतसाहित्याचा मार्ग धरावा , प्रत्येकास विचारांसारखा मार्ग मिळावा संतविचारांतुन समाज घडावा विचारानेच होणार आहे सारा देश नवा , अशा अनेक व्यवस्थेवरती आपले प्रभावी विचार मांडून विचारातून समाज घडावा या संकल्पनेतून देशाभिमान ठेवून 51 पुस्तक प्रकाशनाचा संकल्प उरी बाळगून पुरोगामी विचारांचा वसा जपत संत साहित्याचा मार्ग धरत जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले आहे त्यांच्या या पवित्र कार्याचा विचार करता कोथर्णे गावचे ग्रामस्थांनी त्यांच्या रात्रंदिवस मेहनत करून केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांच्या या पवित्र कार्याचा गौरव करून त्यांना समस्त कोथुर्णे गावच्या कोथुर्णे भुषण गौरव पुरस्कार २०२१, प्रदान करण्यात आला आहे.

तसेच दळवी यांना मिळालेल्या पुरस्कारांबददल बाळासाहेब घोटकुले कार्याध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष , ज्ञानेश्वर दळवी सभापती मावळ शिवाजी महाराज ढोले, वाघुजी दळवी अध्यक्ष वारकरी संप्रदाय पवनमावळ भाऊ बाबुराव दळवी उपसरपंच सिदु विष्णू दळवी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी विठ्ठल रावजी दळवी वाघुजी दळवी किसन दळवी , पांडूरंग लाडू दळवी हिरामण नढे बंडु ठाकर नथू फाटक नंदू जी दळवी किसनराव गावडे ज्ञानेश्वर दळवी, दशरथ दळवी सुनिल पाठारे राम दळवी राजू शेख अदिंनी अभिनंदन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!