ताज्या घडामोडी

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) इंदुरीमध्ये नाताळ साजरा

इंदुरी : चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सद्भावना प्रेम, शांती चे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नाताळ हा सण साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती चौरसिया या विद्यार्थिनीने केले. व नयन निकम या विद्यार्थ्याने प्रेरणादायी सुविचार सांगितला. कुमारी सुहानी वाघमारे या विद्यार्थिनीने आपण क्रिसमस का साजरा करतो? याबद्दल माहिती सांगितली. व कुमारी वैष्णवी राजपुरे या विद्यार्थिनीने क्रिसमस वर कविता सादर केली. कुमारी चांदणी खान या विद्यार्थिनीने येशू ख्रिस्तावर एक कथा सांगितली. कुमार अथर्व वीर कुमारी वैष्णवी माळी व साहिल शिंदे या विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजचा वेश परिधान करून आपल्या सहकारी मित्रांचे मनोरंजन केले .

शाळेच्या सह शिक्षिका प्रज्ञा शिंदे यांनी सांताक्लॉजचा वेश परिधान करून विद्यार्थ्यांमध्ये आश्चर्य निर्माण करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. छान सजलेली क्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी शुभेच्छानी भरलेले फलक तसेच जिंगल बेल्स या मधुर संगीतमय वातावरणामध्ये विद्यार्थी रममाण झाले. शाळेचे संस्थापक माननीय भगवान शेवकर सर यांनी येशू ख्रिस्त यांना अभिप्रेत असलेला आनंद आज शाळेत अनुभवायला मिळाला. त्याच बरोबर प्रेम व शांतीची शिकवणूक अंगीकारणे असा मोलाचा संदेश दिला.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर यांनी विद्यार्थ्यांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून नाताळाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला . या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!