ताज्या घडामोडी

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात विविध उपक्रम

लोणावळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहरच्या वतीने संघर्ष नायक राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधीजी,महात्मा फुले, संत गाडगे महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच गोरगरीब कष्टकरी मजूरांना अल्पोपहर वाटप करून साजरा करण्यात आला.

संघर्षनायकाचा वाढदिवस दिनाची सुरवात करण्यात आली. देश भरात आज रामदास आठवलेंच्या संघर्षमय वाटचालीस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच आज विविध कार्यक्रमाचे पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सोबत लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील आनंद म्हस्के,उप नगराध्यक्ष दिलीपजी दामोदरे, जिल्हा सरचिटणीस गणेशजी गायकवाड,महिला पुणे जिल्हा अध्यक्षा यमुनाताई साळवे,मावळ तालुका मुख्य सचिव अशोक सरवते,उपाध्यक्षा मालनताई बनसोडे,उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, मिलिंद भालेराव, जयराम कदम,चंद्रकांत कांबळे,बापू यादव,रमेश भालेराव,साधनाताई गायकवाड,नारायण शिंदे,सोनकांबळे ताई व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!