ताज्या घडामोडी

औंढे खुर्दचे माजी सरपंच आबाजी आंबेकर यांचे निधन

लोणावळा : औंढे , औंढोली ग्रूपग्रामपंचायतीचे माजी सरपंच आबाजी नारायण आंबेकर (वय-८५) यांचे ता.२९ रोजी सकाळी दहा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांचे पश्चात सहा विवाहित मुलगे व एक विवाहित मुलगी , जावई , पुतने , नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.

औंढे विकास सोसायटी चे चेअरमन सुरेश आबाजी आंबेकर व प्रगतीशील शेतकरी मारूती आबाजी आंबेकर हे त्यांचे सुपुञ होत. तसेच ऊद्योजक नारायण सुरेश आंबेकर व धनेश सुरेश आंबेकर हे त्यांचे नातू होत.

सन १९७४ मधे कै. आबाजी आंबेकर औंढे , औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे सरपंच आणि नंतर च्या पंचवार्षिक मधे ते उपसरपंचही झाले होते. त्यांचे कारकीर्दीत पाणीपुरवठा , रस्ता , शाळा इमारत बांधकाम तसेच अनेक कामे मार्गी लावली आहेत. औंढे खुर्द येथील स्मशानभूमित कै.आंबेकर यांचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!