ताज्या घडामोडी

एकविरा कृती समितीचे पीएमआरडीएच्या विरोधात आमरण उपोषण 

लोणावळा : सोमवार 3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर एकविरा कृती समितीच्या वतीने पीएमआरडीएच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना त्यात राहिलेल्या त्रुटी, चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेले आरक्षण, रस्ते तसेच इंद्रायणी नदीलगत हजारो एकर क्षेत्रात दाखविण्यात आलेली पुररेषा यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

याबाबत अनेकदा निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले. तसेच निदर्शने करण्यात आली.परंतु पीएमआरडीए कडून कुठलाही ठोस निर्णय याबाबत घेण्यात आला नाही त्यामुळे हा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा एकविरा कृती समितीने दिला आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!