ताज्या घडामोडी

कांब्रे येथील जेष्ठ वारकरी हिरामण गायकवाड यांचे निधन

लोणावळा : कांब्रे येथील जेष्ठ वारकरी व प्रगतीशील शेतकरी हिरामण भाऊ गायकवाड (वय-७८) यांचे नुकतेच अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात एक मुलगा ,एक मुलगी ,एक धाकटा भाऊ, तीन विवाहित बहिणी , सून , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे.

जेष्ठ वारकरी रघुनाथ भाऊ गायकवाड हे त्यांचे बंधू , तर प्रगतीशील शेतकरी सुदाम हिरामण गायकवाड हे त्यांचे सुपुञ होत. कै.गायकवाड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. मावळ तालुका दिंडी समाजाच्या कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या अकस्मिक निधनामुळे कांब्रे गावावर शोककळा पसरली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!