ताज्या घडामोडी

उद्या धनगर सेवा संघ पुणे यांच्या वतीने चौदावा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा

पुणे : धनगर समाज सेवा संघ पुणे यांच्या वतीने चौदावा राज्यस्तरीय भव्य वधु वर मेळावा रविवारी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत थोपटे लाॅन्स ,रामनगर रहाटणी येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर यांनी दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र महिला आयोगाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड येथील मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे हे असणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे ,माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, कैलास शेवाळे ,सरपंच गोविंद वलेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

कार्यक्रमाचे आयोजन धनगर सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, सचिव विजय भोजने,संचालक राजेंद्र कवतिके, दर्शन गुंड, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष रोहिदास गोरे,सल्लागार विठ्ठल पिसे,रमेश भांड काळूराम कवतिके आदींनी केले आहे

मेळाव्याला उपस्थित नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!