ताज्या घडामोडी

पोलीस स्थापना दिनानिमित्त तळेगावात पोलिसांचा विशेष सन्मान संपन्न

तळेगाव :  तळेगाव दाभाडे व्यापारी संघटना यांच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी वर्ग यांना पोलीस स्थापना दिनानिमित्त गुलाब पुष्प व पेन भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्याप्रसंगी व्यापारी संघटनेचे किरण ओसवाल म्हणाले की,”कोरोना काळामध्ये अनेक पोलीस बांधवांची बंदोबस्त झालेली परवड आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. कित्येक महिने रात्रंदिवस ते रोडवर बंदोबस्तासाठी उभे राहून नागरिकांना समुपदेशन तसेच कोरोना विषयी जनजागृती करत होते. आजचा दिवस हा त्यांचा सन्मानाचा दिवस आहे. चांगल्या कामाची कौतुक व्हायलाच हवे.शिवाय व्यापारी बांधवांनी देखील पोलीस बांधवांच्या सहकार्यासाठी आपल्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली तर भविष्यात होणारी एखादा गुन्हा किंवा दुर्घटनाही याचा तपास करणे पोलिसांना सोपे होईल.”

त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मतकर साहेब यांनी देखील व्यापारी बांधवांना सीसीटीव्ही यंत्रणा विषयी आग्रहाची भूमिका घ्यावी सर्वांनी सहकार्य केल्यास कोणत्यातरी सी सी टी व्ही मध्ये तो संशयीत व्यक्ती किंवा येणारे वाहन आल्यास पुढील एखादा गुन्हा झाल्यास तपास कामासाठी सहकार्य होईल. तसेच व्यापारी बांधवांनी दुसऱ्या राज्यातील गाड्या आपल्या भागात आल्या तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक श्री मतकर साहेब,श्री हिवरकर साहेब,पोलीस श्री तोडकर साहेब,श्री गिरीगोसाई साहेब,श्री बाबाराजे मुंडे साहेब,श्री भालेराव, राजगुरू मॅडम व ग्रामसुरक्षा दलाचे श्री सुरेश शिंदे देखील उपस्थित होते.

तसेचव्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलजी ओसवाल, कार्याध्यक्ष सागरजी शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष राकेशजी ओसवाल,जिल्हा सरचिटणीस विनोदजी राठोड, शांतीलालजी ओसवाल,किरणजी ओसवाल,जितेंद्रजी राणावत,केयुरभाई शहा,सृजल सुरेश शिंदे व व्यापारी बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!