ताज्या घडामोडी
द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
कामशेत : पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर पुढे जाणाऱ्या अवजड वाहनाला मागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कामशेत जवळील ताजेगावच्या हद्दीत घडली आहे.
अकबर कादर शेख (रा. तेलंगणा) असे अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टेम्पोने पुढे जाणाऱ्या वाहनास जोरदार ठोकून हा अपघात झाला. अपघातग्रस्त व्यक्तीस उपचारासाठी दाखल केले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.