वडगाव येथील रक्तदान शिबिरात 73 जणांचे रक्तदान
वडगाव : येथील स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरीटेबल ट्रस्ट, वडगाव जैन सकल संघ व लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्व. सुषमा सुनील बाफना यांच्या पाचव्या स्मृतिप्रीत्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले. अध्यक्षस्थान माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी भूषविले. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक पावर बँक, ब्लूटूथ, हेडफोन भेट देण्यात आले.
यावेळी वडगाव भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, नगरसेवक किरण म्हाळस्कर, विजय जाधव, प्रसाद पिंगळे, किरण भिलारे, नितीन कुडे, प्रमोद म्हाळसकर लायन्स क्लबचे दिलीप मुथा, भूषण मुथा, अमोल मुथा, नंदकिशोर गाडे, संतोष चेट्टी,बाळासाहेब बोरवके, जैन सकल संघाचे चंपालाल मुथा, आतिष कर्नावट, प्रीतम बाफना, प्रदीप बाफना, सुभाष मुथा उपस्थित होते.
डॉ. सुनील बाफना, चेतन बाफना ,मनोज बाफना, हर्षल बाफना, नवीन बाफना, आदेश बाफना, प्रज्वल बाफना, प्रथम बाफना यांनी शिबिराचे आयोजन केले होते.