ताज्या घडामोडी

वाकसई चाळ येथे विद्या प्रसारिणी सभेची इंग्लिश मीडियम शाळा सुरू 

लोणावळा  : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत विद्या प्रसारिणी सभेच्या इंग्लिश मीडियम शाळेची सुरुवात वाकसई चाळ येथे करण्यात आली. पहिल्या टप्प्यात नर्सरी ते पहिली चे वर्ग सुरू करण्यात आले असून या शाळेचे उद्घाटन संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या वनमाला शिंगरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी विद्या प्रसारिणी सभेचे अध्यक्ष गो. व्य. शिंगरे, कार्यवाह डॉ. सतीष गवळी, शाळा समिती सदस्य अरविंद मेहता ,कन्हैया भुरट, अॅड. संदीप अग्रवाल, धीरूभाई कल्याणजी, नितीन भाई शहा, सरपंच दीपक काशीकर, अमोल शेलार, बाळासाहेब येवले, मनोज जगताप,गणेश देशमुख, महेंद्र शिंदे, कैलास काशीकर, रामदास दरेकर ,भगवान आंबेकर, विजय भुरके, मृणालिनी गरवारे ,साधना कुदळे ,विशाखा भुरके, बालाजी राठोड, नितीन विकारी, प्रवीण येवले, महादू देशमुख, दिलीप देशमुख,हरीविजय देशमुख,पूजा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्या प्रसारिणी सभेला शंभर वर्षांची परंपरा आहे. 1922 साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या 22 शाखा असून 16 हजार विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत. वाकसई व आसपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी लोणावळ्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे वणवण कमी होऊन शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्या दारात येणार आहे त्यामुळे साहजिकच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!