ताज्या घडामोडी

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 

इंदुरी : चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE ), इंदुरी मध्ये  कर्तृत्वाचा प्रेरणास्त्रोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये  सोमवार (दि. ३ जानेवारी) रोजी भारताच्या इतिहासावर अमिट छाप निर्माण करणाऱ्या व महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून कर्तृत्वाची भरारी घेण्यास पंख देणाऱ्या, स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘महिला सक्षमीकरण’  या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास विश्वरेखा फ्लावर्स उद्योजिका सौ. रेखा जोगदंड व विश्वरेखाबायोटेकच्या CEO नम्रता जोगदंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

विद्यालयातील विद्यार्थी कुमारी सायबा खान,कुमारी रुचिता शेवकर तसेच कु.संकेत पांजरकर यांनी देशात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पंडिता रमाबाई,रोकेया सखावत हुसेन व रशुंदरादेवी या महिलांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.  कु. बिशू रावत व कु वैष्णवी माळी या विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुले  यांचा जीवन परिचय व त्यांनी  केलेल्या उल्लेखनीय कार्याविषयी  माहिती सांगितली.कुमारी सिद्धि ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा काव्यमय रित्या परिचय दिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ .रेखा जोगदंड यांनी  त्यांच्या विद्यार्थी जीवनापासून उद्योजिका या पर्यंतच्या खडतर प्रवासा विषयी  विद्यार्थ्यांना  अवगत केले व शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी जिद्दी असावे व सातत्याने अधिकाधिक चांगले करण्यासाठी प्रयत्नरत असावे असा सल्ला दिला.

तसेच कुमारी नम्रता जोगदंड यांनी विश्व रेखाबायोटेक  कंपनीच्या कार्याबद्दल  सोप्या भाषेत माहिती सांगितली.  आयुष्यात यश संपादन करण्यासाठी चिकित्सक वृत्ती, सातत्य व कौशल्य  हे गुण जोपासा व आपले  लक्ष्य साध्य करा असा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी   सुद्धा नम्रता जोगदंड यांच्याशी प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधला व विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी दिशादर्शन केले.

शाळेचे संस्थापक माननीय शेवकर सर यांनी  यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, की पुढे येणाऱ्या काही वर्षांत चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या क्षेत्रात कृतिशील शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करणार असा असे संस्थेचे मानस आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वयम् रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व उद्योजक निर्माण होतील.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर यांनी  आपल्या मनोगतात व्यक्त केले की,शाळा विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण(Experiential learning ) देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना शक्ती निर्माण करणे बाबत कार्यरत आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी महिला सशक्तिकरण व सक्षमीकरण यासाठी जागृती करण्यासाठी  चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले होते. स्त्री शिक्षण ,स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा पद्धती, स्त्री-पुरुष असमानता इत्यादी विद्यार्थ्यांनी बनवलेली भित्तीपत्रिका लावण्यात आली होती. त्याचबरोबर  ‘बेटी बचाव बेटी पढाओ।’असे घोषवाक्य ही देण्यात आली.कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदणी खान या विद्यार्थिनीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!