ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौ.फुटापर्यंच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा

चिंचवड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सुमारे 16 लाख 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा शनिवारी करून अनेक प्रमुखांना आर्थिकदृष्ट्या दिलासा दिला.मुंबईप्रमाणे नाशिक महापालिकेच्या घरांची मालमत्ता 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्यासाठी महापालिकेतील सत्तारुढ भाजपाच्या वतीने हालचाली सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दील आज 27 लाख लोकसंख्या आहे. राज्य परराज्यातील नागरिक मोलमजूरी नोकरी निमित्ताने या शहरात भोसरी, तळवडे, रुपीनगर, काळेवाडी, सांगवी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी भागात अर्धागुंठा जागा घेवून येथे बांधकाम करून राहत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 सालापासून अनेकांच्या नोकर्‍या गेल्या शेकडो परप्रांतीय त्यांच्या राज्यात गेले. पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते, याशहरात मजूर, अर्धकुशल कामगार यांची लोकसंख्या अंदाजे 9 ते 10 लाखांच्या आसपास आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने सन 1980 सालापासून आजपर्यंत पिंपरी-भाटनगर, निगडी-ओटास्किम, चिखली-घरकुल आदी इमारती केंद्र सरकार, राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महापालिका व राहणारा लाभार्थी यांच्याकडून माफक रक्कम घेवून त्यांना कायम निवार्‍याची सोय, हक्काची घरे दिली आहे. यात विधवा, अपंग, अंध, माजी सैनिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले नागरीक वास्तव्यास आहेत. पूर्वी या घरात राहत असलेले नागरीक यापूर्वी झोपडपट्टी, चाळीत भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे जीवनमान व राहनीमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प उभारले. या सर्व भागातील घरे 500 चौरस फुटापर्यंत आहेत. मुंबई महापालिका प्रमाणे यांची घरपट्टी आज अंदाजे 4 ते 6 हजारांपर्यंत दरवर्षी येते. अश्यांची घरपट्टी पिंपरी चिंचवड महापालिकेने माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहराचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, काँगे्रस पक्षाचे माजी शिक्षणमंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, कै. मोतीराम पवार, कै. अशोक तापकीर, राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व सर्व पक्षांचे आजी-माजी नगरसेवकांचे योगदान या शहराच्या विकासासाठी लाभले आहे. या मागणीसाठी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, शरदचंद्रजी पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, माई ढोरे, महापौर यांना आज ई-मेलद्वारे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामअली भालदार यांनी कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!