ताज्या घडामोडी

वडगाव मावळमध्ये लसीकरण मोहिमेअंतर्गत 600 विद्यार्थ्यांचे लसीकरण

वडगाव : केंद्र सरकारच्या वतीने व पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आज ,(4 जानेवारी) रोजी न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मधील विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

वडगाव मावळ पंचायत समिती आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने नवीन इंग्लिश स्कूल मध्ये लसीकरण मोहिम घेण्यात आली. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर शालेय शिक्षण समितीचे सदस्य मनोज ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात शाळा बंद होत्या. शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्याने विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना लस मिळावी. कोणताही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षक वर्गाने घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रम प्रसंगी वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे, शाळेचे पर्यवेक्षक पी. बी. कांबळे, अजय महामुनी, एस. एम.गायकवाड, नगरसेवक रवींद्र काकडे मा.उपसरपंच सुधाकर ढोरे, दिनेश मोरे, गणेश शेडगे,प्रमोद म्हाळसकर, श्रीकांत चांदेकर आधी उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!