ताज्या घडामोडी

कोरोना लसीचा दुसरा डोस घ्या ; अन्यथा क्वारंटाईन करणार  – आमदार सुनिल शेळके

तळेगाव : कोरोनाची पहिली लस घेतलेल्या अनेक नागरिकांची दुस-या डोसची तारीख उलटून गेली आहे. परंतु त्यातील अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. आता अशा नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे.

मावळ तालुक्यात मागील काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

बाहेर फिरण्यास बंदी

ज्या नागरिकांची दुस-या डोसची मुदत झाली आहे त्यांनी 15 जानेवारीपर्यंत आपला डोस घ्यावा अन्यथा 15 जानेवारीनंतर अशा नागरिकांना क्वारंटाईन केले जाईल अश्या नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात येईल असे आमदार सुनील शेळके म्हणाले. कोरोना पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के,तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुक्याचे आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका समन्वयक गुनेश बुगडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व पोलिस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!