ताज्या घडामोडी

कातवी रस्त्यावर कचरा टाकल्यास फ्लेक्स वर फोटो झळकणार

आवाज न्यूज बातमीचा इम्पॅक्ट

 

 

वडगाव : नगरपंचायत शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात सहभागी झाली असून शहरातील वेगवेगळ्या भागात स्वच्छतेची, वृक्षारोपण करणे, साफसफाई करणे आदी कामे केली जात आहेत.

वडगाव नगरपंचायत कडून दोन दिवसांपासून वडगाव हद्दीतील कातवी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत. साफसफाई केलेल्या रोडलगत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिक यशवंतनगर परिसरातून एमआयडीसी कडे जाताना रस्त्यावर सर्रासपणे कचरा उघड्यावर टाकतात आणि निघूण जातात. याबाबत आवाज न्युजने अनेकदा बातमी प्रसारित करत सातत्याने पाठपुरावा  केला होता.या पाठपुराव्याला यश आले आहे. आता अश्या कचरा बहाद्दरांवर वडगाव नगरपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून असणार आहेत.तसेच कचरा टाकल्यास फ्लेक्स वर फोटो झळकणार आहे.

आज वडगाव नगरपंचायत प्रशासनाने कठोर पाऊले उचलत येथील परिसरात स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. आज सकाळी वडगाव नगरपंचायत प्रशासनातील स्वच्छता आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली. वडगाव शहर हद्दीत नगरपंचायत वतीने चार भरारी पथके तयार केली असून येथून पुढील काही दिवसांत कचरा उघड्यावर टाकताना जे कोणी नागरिक आढळून येतील त्यांचे या परिसरात फ्लेक्सवर नावासहीत फोटो लावण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे यांनी दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!