ताज्या घडामोडी

कार्ला येथील ऐतिहासिक तलावकाठी उजाळला गेला मराठ्यांचा इतिहास

कार्ला : ४ जानेवारी १७७९ रोजी कार्ला येथील ऐतिहासिक तलावाकाठी असलेल्या शंभु महादेवाचा अर्शिवाद घेऊन, हर हर महादेवाचा गजर करत मराठे आणि इंग्रज यांच्यात मोठी झाली. मराठ्यांनी गनिमी काव्याने लढलेल्या लढाईत मराठ्यांचा मोठा विजय कार्ला या ठिकाणी झाला, आणि या लढाईत इंग्रजांचा कथित सेनापती स्टुअर्ट फाक्कडा मारला गेला.इतिहासच्या या घटनेचे कायमस्वरूपी स्मरण राहवे म्हणुन कार्ला येथील ऐतिहासिक तलावाकाठी शंभु महादेवास स्मरून दरवर्षी या ठिकाणी ऐतिहासिक घटनेस उजाळा देऊन ऐतिहासिक तलावात दिवे सोडुन दिपोत्सव साजरा केला जातो. असा दिपोत्सव यावर्षीही शेकडो शिवप्रेमीच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

यावेळी शिवभक्त दिगंबर पडवळ व दिनेश ठोंबरे यांनी इतिहासातील घटनेला उजाळा दिल्याने उपस्थित शिवप्रेमींच्या मनात आणि डोळ्यासमोर ऐतिहासिक घटनेचे जिवंत चित्र उभे राहील्याचे दिसत होते.या ठिकाणी इतिहासातील घटनेला उजाळा मिळत असताना शिवमय आणि शंभुमय वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.शेवटी प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र घेऊन व ऐतिहासिक तलावात दिपोत्सव साजरा करून कार्येक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आयोजन कार्ला ग्रांमस्थ व हिंदु समिती लोणावळा व ग्रामीण परीसर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!