ताज्या घडामोडी

तळेगावात डोळसनाथ कॉलनी येथे 42 लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामांचे भूमिपूजन

  • तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या माध्यमातून दि.. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग क्रमांक 10 च्या भाजपा नगरसेविका श्रीमती मंगलताई सुरेश जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून डोळसनाथ कॉलनी येथे रुपये 42 लक्ष अंदाजपत्रकीय रकमेचे समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन डोळसनाथ कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक माननीय चांगदेव डांगे यांच्या शुभहस्ते व श्रीमती मंगलताई सुरेश जाधव, माजी नगरसेविका सुमन ताई कुल,डोळसनाथ कॉलनीनशचे अध्यक्ष शामराव गायकवाड, आदर्श कॉलनी चे सेक्रेटरी रामभाऊ कुल, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ जांभुळकर, राहूल उर्फ मुन्नाभाऊ जाधव, आर्किटेक्ट अतुल हम्पे, भारतीय जनता युवा मोर्चाचे आनंद दाभाडे, , नवनाथभाऊ कुल, दिलीप भाऊ कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कामासाठी भाजपा ओबीसी आघाडी कार्याध्यक्ष श्री सचिन जाधव यांनी सतत पाठपुरावा करून सदर काम मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शहर अभियंता श्री बनसोडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉलनीतील रहिवासी श्री. ठुसे, श्रीधर काका, श्री जोगळेकर, श्री विजय शिंदे, बांधकाम व्यावसायिक सुरेश लबडे, महेश मुंडर्गी, नानाजी गोविंद , मधुकर हंप्पीहोळी, कुलकर्णी, सलागरे, प्रकाश वाघ, दत्तात्रय जाधव, दिलीप शिंदे, गुलाब सावंत, लालू सिंग नवले, नाडगीरकाका, पवारकाका, रामाकाका , कुंदन चित्र, इत्यादी मान्यवर नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक सचिन भाऊ टकले यांनी केले व उपस्थितांचे आभार राष्ट्रपती पदक विजेते माजी पोलिस अधिकारी प्रदिप दादा देसाई यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोळसनाथ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण डांगे, दीपक गायकवाड, सागर भोईर ,अजिंक्य टकले, आदित्य माने, चेतन गुप्ते, आनंद जाधव, ज्ञानेश्वर गुंड, सूरज रायकर, चैतन्य कुलकर्णी समाज मंदिर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर श्री कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.चहा व नाश्ता करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!