ताज्या घडामोडी

आंबवणे येथील सोनू अनाजी वाळंज विद्यालयात कोरोना लसीकरण पडले पार

आंबवणे : राज्यभरात 03 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांची लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.कोराईगड शिक्षण संस्था संचालित, सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथेही कोरोना लसीकरण कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. मृणाल पटवर्धन म्हणाल्या,’सद्य परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या या वयोगटातील लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हा! घाबरू नका!! सुरक्षित व्हा!असे आवाहन केले.या प्रसंगी पालकांनी व मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

या आधी जिजाऊ ते सावित्री ‘सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान निमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात सौ. छाया परिठ यांनी लसीकरणबाबत माहिती देऊन कशी काळजी घ्यावी ते समजावून सांगितलं.

या प्रसंगी विद्यमान उपसरपंच सौ संगीता नेवासकर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नारायण दळवी, सुरेश नेवासकर सा. कार्यकर्ते, ज्योत्स्ना बाणाईत अंगणवाडी सेविका, मंदा वाळंज मदतनीस या उपस्थित होत्या.

लसीकरणासाठी पूर्वा दळवी सुपरव्हायझर,आरोग्य सेविका बारवल मॅडम, आशा मोढवे, आशा कराळे, चव्हाण सर यांनी विशेष सहकार्य केले.उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला विद्यालयातील शिक्षक – कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

शासन आदेशानुसार ग्रामीण भागात पहिल्याच दिवशी लसीकरण केले जात आहे.कोविड व्हेरियंट प्रसाराचा काळ लक्षात घेता लसीकरण खूप महत्वाचे कार्य आहे. असे  यावेळी कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज यांनी मनोगतात सांगितले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!