ताज्या घडामोडी

तळेगाव शहरात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

तळेगाव ‍: दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले दर्पण साप्ताहिक ६ जानेवारी १८३२ सली सुरू केले. तेव्हापासून मराठी वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारीला पत्रकार दिन म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तमाम पत्रकार हे या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतात.

तळेगाव दाभाडे प्रेस क्लबच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांना आज विनम्र अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल, माजी नगराध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष सुरेश धोत्रे, डॉ. मिलिंद निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे विद्यमान अध्यक्ष गणेश बोरुडे ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव गुरुजी आवाज न्यूजचे संपादक गोपाल परदेशी, राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, संदीप भेगडे, काकासाहेब काळे, राजेश बारणे,कैलास भेगडे,अंकुश दाभाडे, दिलीप डोळस, प्रशांत वाबळे, कोठे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न झालेल्या या कार्यक्रमादरम्यान चित्रा जगनाडे, मधुकर सावंत, विलास भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काकासाहेब काळे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास भेगडे तर आभार प्रदर्शन गणेश बोरुडे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!