ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठीच्या पूर्व तपासणी शिबिरास तळेगावात प्रारंभ

तळेगाव : संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत तसेच दिव्यांग बांधवांना एडिप योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी व पूर्वनोंदणीच्या दोन दिवसांच्या शिबिरास तळेगाव दाभाडे येथे आज आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी आलेल्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसोबत आमदार शेळके यांनी संवाद साधताना “ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक कृत्रिम अवयव,सहाय्यभूत साधने या योजनेद्वारे मिळणार आहेत.यामध्ये श्रवण यंत्र, घडी होणारे वॉकर, चालण्याची काठी, कॅलिपर, ॲल्युमिनियम कुबड्या आदी. साधनांचा समावेश आहे.ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.

यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वयक गुणेश बागडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, युवक अध्यक्ष.सुनिल दाभाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, नगरसेविका वैशाली दाभाडे,मंगल भेगडे, युवती अध्यक्षा निशा पवार,ज्योती शिंदे, तुषार काळोखे आदि मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!