ताज्या घडामोडी

प्लॅस्टिक द्या, वडापाव घ्या ; पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिकच्या समस्येवर एक भन्नाट योजना राबविली आहे. या योजनेसाठी महापालिका रस्त्यावरील वडापावच्या गाडीवाल्यांची मदत घेणार आहे. नागरिकांनी त्यांच्या जवळ असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या या वडापाववाल्यां जवळ जमा करून वडापाव व चहा घ्यावा अशी ही योजना आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात प्लॅस्टिकचा कचरा ही मोठी समस्या बनत चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 32 प्रभागांच्या 128 वाॅर्डमध्ये प्रत्येकी 1-1 वडापाव सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी नागरिकांनी पाच बाटल्या देऊन चहा तर दहा बाटल्या जमा केल्यास एक वडापाव मिळणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या योजनेमुळे शहरात रस्त्यावर पडणारा प्लास्टिकचा कचरा कमी होऊन शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल असा विश्‍वास महापालिकेला आहे.शहरातील गरीब जनतेला या योजनेचा फायदा होऊ शकतो. या योजनेला आगामी काळात शहरातील नागरिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!