ताज्या घडामोडी

कामशेतकरांसाठी आता पावत्या ऑन डिमांड 

कामशेत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अश्यातच कामशेतकरांनी मात्र कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले आहेत. मावळ तालुक्यामध्ये तसेच कामशेत शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनारुग्ण संख्या वाढीस लागली आहे तरीही कामशेतकरांना मात्र याची काहीच चिंता नसल्याचे चित्र सध्या कामशेत बाजारपेठेमध्ये दिसत आहे.

कामशेत हे आजूबाजूच्या सत्तर गावांची बाजारपेठ आहे. येथे खरेदीला आलेली काही स्वयंघोषित “पुढारी” मंडळी आपल्याला कोरोना होणारच नाही अश्या आविर्भावात फिरताना पाहायला मिळतात. अश्याच स्वयंघोषित “पुढारी” मंडळींमुळे कामशेत मधल्या मुख्य चौकामध्ये गर्दीचे प्रमाण वाढीस लागले आहे. कामशेतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, गणपती चौक, पवना चौक व कामशेत मधील बँक ऑफ महाराष्ट्र ह्या ठिकाणी ही पुढारी मंडळी तासनतास गप्पा मारताना पाहायला मिळतात.

कामशेत रेल्वे स्टेशन जवळील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाजवळ एक तरी पोलीस अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी कामशेत मधील काही सुज्ञ नागरिक करीत आहेत. पंडित नेहरू महाविद्यालय सकाळी साडेअकरा नंतर सुटल्यावर येथे अचानक पणे गर्दी जमते. ह्या गर्दीत साधारणतः किशोरवयीन मुले सर्वाधिक प्रमाणात आढळतात. अश्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!