ताज्या घडामोडी

एमआरआय मशीन कोट्यवधींची फसवणूक प्रकरणी फेर तपासाचे पोलीस आयुक्तांचे आदेश

डॉ. श्रीहरी डांगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

 

तळेगाव : सन 2015 -16 साली एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने एका कंपनीच्या संचालकांनी तळेगाव दाभाडे येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी मुळे न्याय मिळाला नाही याची तक्रार डॉ. डांगे यांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे केली असता सदर गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याचे आणि फसवणुकीचा गुन्हा तपासावर घेण्यासाठी न्यायालयात पत्र  व्यवहार करण्याचे आदेश कृष्णप्रकाश यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना दिली असल्याची माहिती डॉ. डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. श्रीहरी डांगे म्हणाले, मी व माझी पत्नी श्री डायग्नोस्टिक सेंटर चालवतो आम्हाला एमआरआय मशीनची गरज असल्याने मॅक्सिस हेल्थकेअर इमॅजिनिंग( इंडिया) या कंपनीने 2014 – 15 साली कोटेशन पाठवले आणि दोन कोटी चार लाखाची रक्कम आगाऊ मागितली.

रक्कम अदा करूनही मॅक्सिस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) कंपनीचे भागीदार तुलसी पितांबर दास, नीरव हसमुख राय पंचमाटीया जर्नल सिंग प्रेमसिंग बावा,इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला डॉ. मेधा निरव पंचमाटिया  (सर्व राहणार मुंबई) यांनी एमआरआय मशीन पाठवली नाही.

या प्रकरणाचा पूर्वी तपास झालेला असून ‘क’ समरी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. परंतु मला ते मंजूर नाही. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबाबत तपासणीचे आदेश दिले आहेत असे डॉ. डांगे म्हणाले.

फसवणूक प्रकरणातील रक्कम मिळताच डॉ. डांगे  त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करणाऱ्यांचे पैसे परत करतील. तरी त्यांना आर्थिक व्यवहार करता अडचणीत आणू नये असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!