ताज्या घडामोडी
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 123 जणांवर दंडात्मक कारवाई
लोणावळा : राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 123 जणांवर दंडात्मक कारवाई लोणावळा ग्रामीण व शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे.
रविवारी वरसोली टोल नाक्यावर व परिसरातील विविध भागात 100 जणांवर कारवाई करण्यात आली असून 56 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तर लोणावळा शहर पोलिसांनी मास्क न लावणाऱ्या 23 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.