ताज्या घडामोडी

लोणावळा महाविद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या लोणावळा महाविद्यालयाच्या वतीने (6 जानेवारी) पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांचा आज  सन्मान करण्यात आला.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पत्रकारांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती यावेळी दाखविण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अॅड. संजय पाटील, पत्रकार विशाल पाडाळे, बंडू येवले, सुनील चव्हाण, संजय हुलावळे, नितीन तिकोणे,हेमा कचरे संतोषी तोंडे ,दीपक तारे यांचा सन्मान करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सन्मानाने पत्रकार भारावून गेले होते.

यावेळी संजय पाटील यांनी महाविद्यालयाची महती सांगणारी कविता सादर केली. श्रीराम कुमठेकर यांनी जुन्या आठवणी जागवत पत्रकार यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तर विशाल विकारी यांनी पत्रकारिता एक आव्हान असल्याचे सांगत पत्रकारितेचे समाजातील महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना दत्तात्रय पाळेकर यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी दरात उच्च शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगितले.अॅड. नीलिमा खिरे यांनी संस्थेचे आजपर्यंतची वाटचाल उपस्थितांसमोर मांडली.

संजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन रोहन वर्तक यांनी केले. दीपक तारे यांनी उपस्थितांचे आभार मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनराज पाटील, सविता पाटोळे ,संजय साळुंखे, श्रीकांत होगले ,विजेश कट्टीकलम  यांचे सहकार्य लाभले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!