ताज्या घडामोडी

चिंचवडमध्ये आयोजित रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद

चिंचवड : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद व फातिमाबी शेख यांच्या जयती निमित्ताने तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पिंपरी चिचवड शहर जिल्हा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले गेले.अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हाजी युसुफ कुरेशी यांनी आयोजित केलेल्या या शिबीरामध्ये डॉ अलका शिंदे आणि टेक्नीशियन अनिता लोंढे, अंबिका शिंदे, श्रीकांत बीराजदार, सिद्धार्थ आणि राहूत शहापूरकर यांचा समावेश होता.

तसेच या शिबीरला माजी महापौर मोहम्मद भाई पानसरे, नगरसेविका गीताताई मंचरकर, माझी शिक्षण मंडळ सभापती फजल भाई शेख, आय का. अल्पसंख्यांकचे अध्यक्ष शहाबोद्दिन शेख व हाजी गुलाम रसुल या मान्यवरांनी हजेरी लावली.

शिबीर आधार ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित केले. शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे रक्त साठा 40-50 बोटल झाले, यामध्ये बहुतांश अल्पसमाजाने सहभाग घेतला.

कोव्हिडच्या वाढत्या प्रार्दुभाव अनुसरून रक्त साठा कमी पडू नये म्हणून शिबीर आयोजित केले गेले. शिबीराचे मुख्य संयोजक रा. का. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष श्री हाजी युसुफ कुरेशी, कमरूनिसा शेख, ॲड नसिबूननिसा खान, नासिर शेख, नजीर वाघु, जाविदमिया जहागिरदार, मो. शरीफ मुलानी, हाजी अकबर मुल्ला, फकीर मुलानी, शहाजी आत्तार, इंद्रिस मेमन, मुश्ताक शेख, फारुक कुरेशी, फौज दलाल, सलीम मेंमन, यानी सहभाग घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!