ताज्या घडामोडी

भातखळकर यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आज जोडे मारो आंदोलन 

तळेगाव : अतुल भातखळकर यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर आरोप केले. त्याच्या निषेधार्थ मावळ राष्ट्रवादीच्या वतीने वडगाव मावळ येथे भातखळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे हे आंदोलन होणार आहे तसेच आमदारांची नाहक बदनामी करणाऱ्या भातखळकर गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे .

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेले आरोप व समाजात तेढ निर्माण होईल असे भातखळकर यांनी केलेले वक्तव्य याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

यावेळी (रा. काँ. मावळ अध्यक्ष )बबनराव भेगडे, (पुणे जि. नि. समिती सदस्य) विठ्ठलराव शिंदे, (संत तु. स. सा. का. उपाध्यक्ष) बापूसाहेब भेगडे, (रा. काँ. ग्रा. ब्लॉक मा. अध्यक्ष) सुभाष जाधव, (रा. काँ. मा कार्याध्यक्ष )दीपक हुलावळे, (रा. यु. काँ. पुणे जि.अध्यक्ष) सचिन घोटकुले, (रा. म.काँ. मा. अध्यक्ष) सुवर्णा राऊत, (रा. यु. काँ. मावळ अध्यक्ष) सुनील दाभाडे,(रा.यु. काँ. मा) निशा पवार,( रा.ल वि. काँ. मा. अध्यक्ष) नवनाथ चोपडे,(रा. काँ.ओ. सेल पुणे जि. कार्याध्यक्ष) अतुल राऊत ,(रा. काँ. अ. सेल मावळ अध्यक्ष) आफताब सय्यद (रा. काँ. सोशल मीडिया अध्यक्ष) संजय भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!