ताज्या घडामोडी

लसीचे दोन डोस घेतले असतील तरच मिळणार लोणावळ्यात प्रवेश 

लोणावळा : प्रसिद्ध पर्यटन स्थळ लोणावळ्यासह तालुक्यातील कामशेत, कान्हे, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉईंट वर सोमवार (17 जानेवारी) पासून नाकाबंदी करण्यात येणार असून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना शहरात प्रवेश मिळणार आहे.

राज्यासह तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रांताधिकार्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली आहेत. प्रवेश दारावर नगरपंचायत,  नगर परिषद प्रशासनाच्या मदतीला पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.

लसीचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत का? दुसरा डोस ची मुदत संपली आहे का? की लसच घेतली नाही याची पडताळणी केली जाणार आहे. लस न घेतलेल्यांना तेथेच लस देण्यात येणार आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!