ताज्या घडामोडी
साक्षी डायग्नोस्टिकच्या वतीने मोफत महाआरोग्य निदान शिबिराचे आयोजन
तळेगाव : साक्षी डायग्नोस्टिक व साक्षी नोबेल फाउंडेशनच्या वतीने आज (दि. 26 जानेवारी) रोजी मोफत महाआरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुभारंभ कॉम्प्लेक्स तळेगाव दाभाडे येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडणाऱ्या या शिबिरात CBC,BSL,TSH,Blood group,cholestrol, Height, weight,B.P आदी आठ तपासण्या मोफत केल्या जातील. तर कोणत्याही डिजिटल एक्स-रे विथ रिपोर्ट साठी केवळ 200 रुपये आकारले जाणार आहेत.
या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन साक्षी नोबल फाऊंडेशनचे संचालक संस्थापक राजेंद्र किल्लावाला व सिद्धार्थ किल्लावाला यांनी केले आहे.