ताज्या घडामोडी

रोटरीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राला बाकडे प्रदान

तळेगाव : प्रजासत्ताक दिनी तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्यामार्फत तेथे येणाऱ्या (रुग्णांना) बसण्यासाठी बैठक व्यवस्था म्हणून बाकडे प्रदान करण्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नितीनजी मराठे यांच्या शुभहस्ते बाकडे प्रधान लोकार्पण सोहळा पार पडला रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोयीसुविधा पुरवाव्यात असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य नितीनजी मराठे यांनी केले
संस्थापक रो विलास काळोखे यांनी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी गोर गरीब रुग्णांसाठी नक्कीच हातभार लावेल असे आश्वासन दिले.

यावेळी सुरेशजी धोत्रे, दिलीप पारेख,नितीन शाह,निवृत्ती फलके,  काळे उपस्थित होते प्रकल्पप्रमुख किरण ओसवाल , माजी अध्यक्ष संतोष शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश शेंडे, संजय मेहता, तानाजी मराठे,संतोष परदेशी,बाळासाहेब रिकामे, सुनील महाजन,शरयू देवळे, रेशमा फडतरे,रिजवाना शेख व विश्वास कदम यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन संतोष लोणकर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!